गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2023
Written By
Last Modified: रविवार, 21 मे 2023 (12:13 IST)

IPL 2023 : लखनौने कोलकात्याला एका धावेने पराभूत केले, प्लेऑफमध्ये पोहोचणारा तिसरा संघ ठरला

IPL 2023 KKR vs LSG : लखनौ सुपर जायंट्सने कोलकाता नाइट रायडर्सचा एका धावेने पराभव केला. या विजयासह लखनौ सुपर जायंट्स प्लेऑफमध्ये पोहोचणारा तिसरा संघ ठरला आहे. त्याचबरोबर कोलकाता संघ या पराभवासह प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. या सामन्यात कोलकाताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि लखनौने प्रथम फलंदाजी करताना १७६ धावा केल्या. प्रत्युत्तरात कोलकाता संघ केवळ 175 धावा करू शकला आणि सामना गमावला.
 
लखनौ सुपर जायंट्सने कोलकाता नाईट रायडर्सचा एका धावेने पराभव केला. या रोमांचक सामन्यात लखनौने प्रथम फलंदाजी करताना आठ विकेट्सवर 176 धावा केल्या. प्रत्युत्तरात कोलकाता संघ सात गड्यांच्या मोबदल्यात 175 धावाच करू शकला आणि एका धावेने सामना गमावला. लखनौकडून निकोलस पूरनने सर्वाधिक 58 धावा केल्या. त्याचवेळी कोलकाताकडून वैभव अरोरा, शार्दुल ठाकूर आणि सुनील नरेन यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. या सामन्याच्या दुसऱ्या डावात रिंकू सिंगने कोलकाताकडून सर्वाधिक 67 धावा केल्या. लखनौकडून रवी बिश्नोई आणि यश ठाकूर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
 
या विजयासह लखनौ प्लेऑफमध्ये पोहोचणारा तिसरा संघ ठरला आहे. आता प्लेऑफमध्ये एकच जागा रिक्त असून, त्यासाठी मुंबई आणि बंगळुरू यांच्यात निकराची लढत होणार आहे. या दोन्ही संघांनी आपले शेवटचे सामने मोठ्या फरकाने गमावल्यास राजस्थानचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकतो.
 
प्रथम फलंदाजी करताना लखनौ सुपर जायंट्स संघाने आठ विकेट्सवर176 धावा केल्या. लखनौकडून निकोलस पूरनने सर्वाधिक 58 धावा केल्या. त्याचवेळी डिकॉकने 28 आणि प्रेरक मंकडने 26 धावा केल्या. आयुष बडोनीने 25 धावा केल्या. कोलकाताकडून सुनील नरेन, शार्दुल ठाकूर आणि वैभव अरोरा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
 
 



Edited by - Priya Dixit