सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2023
Written By
Last Modified: शनिवार, 27 मे 2023 (09:00 IST)

IPL 2023: शुभमन गिल हंगामात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला, ऑरेंज कॅप पटकावली

क्वालिफायर-2 मध्ये गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्सचे संघ आमनेसामने आले होते. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पावसामुळे टॉसला 45 मिनिटे उशीर झाला. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरातकडून शुभमन गिल आणि रिद्धिमान साहा यांनी डावाची सुरुवात केली. डावाच्या दुसऱ्या षटकातच शुभमनने मोठी कामगिरी केली.
 
शुभमन गिल हंगामात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला.  त्याने ऑरेंज कॅप ताब्यात घेतली. सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत गिलने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फाफ डुप्लेसिसला मागे सोडले. डुप्लेसिसने 14 सामन्यांच्या 14 डावात 730 धावा केल्या. त्याने आठ अर्धशतके झळकावली. डुप्लेसिसची सरासरी  56.15 आणि स्ट्राइक रेट 153.68 होता.
 
या सामन्यात डुप्लेसिसला मागे सोडण्यासाठी गिलला नऊ धावा करायच्या होत्या. मुंबईविरुद्धच्या सामन्यापूर्वी त्याने चालू हंगामात 15 सामन्यांत 722 धावा केल्या होत्या. मुंबईविरुद्धच्या दुसऱ्या षटकात त्याने कॅमेरून ग्रीनच्या शेवटच्या चेंडूवर सिंगल मारून डुप्लेसिसला मागे टाकले.
 
शुभमन गिलने मुंबईविरुद्ध 129 धावा केल्या. त्याने 60 चेंडूंच्या खेळीत सात चौकार आणि 10 षटकार मारले. गिलचे हे चार सामन्यातील तिसरे शतक आहे. साखळी फेरीतील शेवटच्या दोन सामन्यांमध्ये त्याने सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध शतके झळकावली. गिलशिवाय साई सुदर्शनने 31 चेंडूत 43 धावा केल्या. 
 
कर्णधार हार्दिक पंड्याने 13 चेंडूत नाबाद 28 धावा केल्या. त्याने दोन चौकार आणि दोन षटकार मारले. रिद्धिमान साहाने 16 चेंडूत 18 धावा केल्या. रशीद खानने दोन चेंडूत पाच धावा केल्यानंतर नाबाद राहिला.
 



Edited by - Priya Dixit