न्यूज साइट असो वा शॉपिंग साइटचा ट्रॅफिक आता मोबाइलवर वाढत जात आहे. जर तुमची वेबसाइट मोबाइल फ्रेंडली असेल तर ती सर्चमध्ये टॉपला आणण्यासाठी खास टिप्स आम्ही तुम्हाला देणार आहोत. तुमच्या वेबसाइटवरील किंवा ब्लॉगवरील कंटेट म्हणजेच मजकुरावर तुम्ही जास्तीत जास्त लक्ष द्यायला हवं. जर मजकूर वाचनीय, माहितीपूर्ण असेल तर तुमची वेबसाइट किंवा ब्लॉगवरील ट्रॅफिक वाढेल.
मजकूर जेवढा सोशल फेंडली म्हणजेच आजच्या सोशल मीडियाच्या भाषेनुसार असेल तर अधिक लोकप्रिय होईल. यामुळे व्हिजिटर्सची संख्या वाढेल. एखादा लेख किंवा संबंधित मजकूर प्रकाशित करण्याआधी त्याखाली आधीच्या लेखांची लिंक द्या. जेणेकरुन तुमच्या व्हिजिटर्सना अधिक चांगला आणि वैविध्यपूर्ण मजकूर मिळेल. तुमच्या वेबसाइटचा स्पीड किती आहे, हेही गुगल सर्चमध्ये टॉप येण्याच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. कारण वेबसाइट, ब्लॉग हेवी असेल तर एखादा लेख लोड होण्यास वेळ लागतो आणि परिणामत: व्हिजिटर्स कंटाळून वेबसाइट बंद करु शकतात. याचा परिणाम गुगल सर्चमध्ये टॉप येण्यावर होतो.