बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Updated : मंगळवार, 20 फेब्रुवारी 2018 (15:13 IST)

म्हणून ट्विटरच्या टीमने घेतली अमिताभ यांची भेट

काही दिवसांपूर्वी महानायक अमिताभ बच्चन  यांनी ट्विटरवरून काढता पाय घेण्याचा इशारा दिला होता. त्यांच्या याच ट्विटची दखल घेत चक्क ट्विटरची एक टीम त्यांच्या भेटीला पोहोचली. ट्विटरचे काम कशा पद्धतीने चालते, हे समजावून सांगण्यासाठी त्यांनी बिग बींची भेट घेतली.

‘मी ट्विटरच्या दुनियेतून काढता पाय घेत आहे, कारण माझ्या फॉलोअर्सचा आकडा कमी झाल्याचं समजतंय. ट्विटरच्या या समुद्रविश्वात इतरही काही मासे म्हणजेच ट्विटर युजर्स आहेत, जे अनेकांनाच आवडतात,’ असं ट्विट अमिताभ यांनी ३१ जानेवारी रोजी केलं होतं. ट्विटर सोडण्याचा जणू त्यांनी इशाराच दिला होता. त्यांच्या या तक्रारीचं निवारण करण्यासाठी आणि ट्विटर कशा पद्धतीने काम करतं, हे समजावून सांगण्यासाठी चक्क ट्विटरची टीम बिंग बींच्या भेटीला पोहोचली. या भेटीदरम्यानचा फोटो शेअर करत बिग बींने टीमचे आभार मानले. ट्विटरचे काम खरंच पारदर्शक आहे, असंही त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलं.