रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 ऑगस्ट 2020 (16:08 IST)

गूगलचा चीनला दणका, चीनची २५०० पेक्षा जास्त यूट्यूब चॅनेल्स डिलीट केली

गूगलने चीनची २५०० पेक्षा जास्त यूट्यूब चॅनेल्स डिलीट केली आहेत. त्यामुळे चीनला याचा मोठा फटका बसणार आहे. गूगलकडून सांगण्यात आले आहे की, चीनशी संबंधित २५०० पेक्षा जास्त यूट्यूब चॅनेल्स डिलीट केले आहेत. चुकीच्या आणि खोट्या बातम्या पसरवत असल्याचे कारण देत गूगलकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
 
गूगलने हटविलेले यूट्यूब चॅनेल्स स्पॅमी आणि बिगर राजकीय कंटेन्ट पोस्ट करत होते. तसेच, यामधील काही भाग राजकारणाशी संबंधित होता. दिशाभूल करणारे व्हिडिओ चीनने यूट्यूब प्लॅटफॉर्मवर शेअर केल्याचे कारण देत गूगलने हा व्हिडिओ स्ट्राईक करत २५०० हून अधिक चॅनेल डिलिट केले आहेत. 
 
चॅनेल्स तपासणीच्या कामादरम्यान गूगलला काही व्हिडिओ चॅनेल संदर्भात माहिती मिळाली. त्यानंतर गूगलने योग्य ती खातरजमा करुन एप्रिल ते जून या तिमाहीत हे यूट्यूब चॅनेल हटवले आहेत. आपल्या तिमाही अहवालात गूगलने यासंदर्भात माहिती दिली आहे.