Jio धमाका: डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगसह 84 दिवसांची वैधता, जिओ अॅप सब्सक्रिप्शन फ्री
रिलायंस जियो नेहमीच आपल्या यूजर्ससाठी नवीन आणि फायद्याचे प्लान लॉच करत असतो. यूजर्सची गरज बघता जिओने एक आणखी चांगला प्लान प्रस्तुत केला आहे, ज्यात यूजर्सला डेटा यासोबतच अनलिमिटेड कॉलिंग आणि जिओ अॅप्स फ्री सब्सक्रिप्शन मिळेल.
जिओच्या या प्लानमध्ये यूजर्सला 6 GB डेटासह जियो टू जियो नेेटवर्कवर अनलिमिटड कॉलिंग सुविधा मिळते. हे प्लान त्या ग्राहकांसाठी आहे ज्यांना लांब वैधतेसह डेटाद्वारे कॉलची गरज भासते.
जिओचं नवीन प्रीपेड प्लान यूजर्सच्या गरजा लक्षात घेत लॉन्च केले गेले आहे. प्लानची किंमत 329 रुपए असून याची वैधता 84 दिवसांची आहे. यात फायदा म्हणजे जियो ते जियो नेटवर्कवर कॉलिंगसाठी अनलिमिटेड सुविधेसह ग्राहकांना 1000 फ्री SMS ची सुविधा देखील मिळते. तसेच जिओ अॅप्सची सुविधा मोफत मिळते. अर्थात या प्लानसोबत आपण जिओचे सर्व OTT अॅप्सचे सब्सक्रिप्शन मोफत मिळवू शकता. या योजनेत यूजर्सला 84 दिवसांसाठी 6 जीबी डेटा मिळत आहे. डेटा लिमिट संपल्यावर इंटरनेट स्पीडमध्ये कपात होऊन 64Kbps राहते.