गुरूवार, 14 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: मंगळवार, 4 एप्रिल 2017 (16:08 IST)

इंटरनेट स्पीडमध्ये रिलायन्स जिओच नंबर वन

इंटरनेट स्पीडच्याबाबतीत रिलायन्स जिओ पहिल्या क्रमांकावर असल्याचं दूरसंचार नियामक म्हणजे ट्रायने म्हटलं आहे.  ट्रायच्या डेटानुसार इंटरनेट स्पीडच्याबाबतीत रिलायन्स जिओ पहिल्या क्रमांकावर आहे. रिलायन्स जिओचा डेटा डाऊनलोड स्पीड इतर प्रतिस्पर्धी कंपन्या आयडिया सेल्यूलर आणि एअरटेलपेक्षा दुप्पट झाला असल्याचं ट्रायने म्हटलं आहे. फेब्रुवारी महिन्यात जिओ नेटवर्क सर्वात वेगवान ठरलं आहे. जिओ नेटवर्कचा फेब्रुवारी महिन्यातील इंटरनेट स्पीड 16.48 एमबीपीएस होता. पण जानेवारीच्या तुलनेत हा स्पीड कमी झाला आहे. जानेवारीत जिओचा स्पीड 17.42 mbps एमबीपीएस होता. जिओचे प्रतिस्पर्धी आयडिया सेल्युलर 8.33 एमबीपीएस दुसऱ्या स्थानावर आणि एअरटेल 7.66 एमबीपीएस तिसऱ्या स्थानावर आहे. तर वोडाफोनचा स्पीड 5.66 एमबीपीएस आहे. तर बीएसएनएलचा 2.89 एमबीपीएस आहे. ट्रायच्या डेटानुसार, फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी सरासरी डाऊनलोड स्पीड रिलायन्स कम्युनिकेशन्ससाठी 2.67 एमबीपीएस तर टाटा डोकोमोसाठी 2.67 एमबीपीएस तर एअरसेलसाठी 2.01 एमबीपीएस आहे. इतर नेटवर्कसाठी सरासरी डाऊनलोड स्पीड उपलब्ध नाही.