गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

ATM हून पैसे काढताना आपण करत असाल या चुका तर सावध व्हा

बँकेच्या महत्त्वपूर्ण सुविधांमधून एक ATM आहे. ही अशी सुविधा आहे ज्यात 24 तास पैसा काढता येऊ शकतो. परंतू एटिएम वापरण्यासाठी सावध राहणे गरजेचे आहे. अलीकडे एटिएम फ्रॉड प्रकरण वाढत चालले आहे. अनेकदा पैसा काढताना लोकं अश्या चुका करतात ज्यामुळे कार्ड हॅक होण्याची भीती असते.
 
अलीकडे अश्या अनेक घटना समोर आल्या आहेत ज्यात क्लोन एटिएम तयार करून लोकांच खाते रिकामे करण्यात आले. हॅकर कोणत्याही यूजरचा डेटा ATM मशीनमध्ये कार्ड लावणार्‍या स्लॉटहून चोरून घेतात. अशात आम्ही आपल्या सावध करत आहोत ज्याने अश्या घटनांपासून वाचता येईल.
 
- ATM मध्ये गेल्यावर ATM कार्ड स्लॉट लक्ष देऊन पहा. आपल्याला जाणवलं की ATM कार्ड स्लॉटमध्ये छेडखानी केली गेली आहे किंवा स्लॉट लूज आहे किंवा काही गडबड वाटल्यास चुकूनही वापरू नका.
 
- कार्ड स्लॉटमध्ये कार्ड लावताना ATM मध्ये जळणार्‍या लाइटवर लक्ष द्या. स्लॉटमध्ये ग्रीन लाइट जळत असल्यास ATM सुरक्षित आहे परंतू लाल लाइट जळत असल्यास किंवा लाइट नसेलच तर ATM वापरू नका.
 
- आपल्या डेबिट कार्डचे पूर्ण ऍक्सेस घेण्यासाठी हॅकर्सकडे आपले पिन नंबर असणे आवश्यक आहे. हॅकर्स पिन नंबरला एखाद्या कॅमर्‍याने ट्रॅक करू शकतात. यापासून वाचण्यासाठी पिन नंबर टाकताना दुसर्‍या हाताने नंबर्स लपवावे ज्याने त्याची इमेज सीसीटीव्ही कॅमेरा कॅच करू शकणार नाही.