मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: बुधवार, 7 जुलै 2021 (10:47 IST)

काय सांगता,अंतराळात बनणार पार्क,अमेझॉन चे मालक जेफ बेझोस करणार प्रवास

कधी कधी बघितलेले स्वप्न कधी पूर्ण होतील हे सांगता येणं अवघड आहे.असे अमेझॉनचे मालक जेफ बेझोस यांचा बाबतीत झाले आहेत.त्यांनी लहान वयात असताना एक स्वप्न बघितले होते आणि आज त्या स्वप्नाची पूर्णता होण्याच्या मार्गावर आहे.त्यांनी बघितलेल्या स्वप्नाप्रमाणे ते त्यांची कंपनी ब्लू ओरिजनच्या न्यू कॅप्सूल मधून चक्क 11 मिनिटासाठी अंतराळाच्या प्रवासासाठी जाणार आहेत.
 
बेझोस हे तीक्ष्ण आणि तल्लख बुद्धीचे विद्यार्थी होते.त्यांची स्वप्ने देखील इतर मुलांपेक्षा आगळी वेगळी होते.ज्या किशोरवयात मुलं मुली वेगळ्याच उत्साहात असतात त्या वयात बेझोस आपले स्वप्न पूर्ण करण्याच्या जिद्दीत होते. त्यांनी अंतराळात एक पार्क बनवायचे असे स्वप्न बघितले होते आणि आता त्यांचे हे स्वप्न लवकरच पूर्ण होणार.
 
त्यांनी 2000 साली ब्लू ओरिजिन नावाची एरोस्पेस कंपनीची सुरुवात केली.या कंपनीच्या माध्यमाने अंतराळात एक वस्ती वसविण्याचे त्यांचे स्वप्न आहे.त्यांचा हा हेतू पृथ्वीचे संरक्षण करण्यासाठीचा आहे.
 
बेझोस हे येत्या 20 जुलै रोजी अंतराळ प्रवासावर जाणार आहे.या प्रवासात त्यांचे भाऊ मार्क बेझोस देखील असणार.मी वयाच्या 5 व्या वर्षांपासून अंतराळ प्रवास करण्याचे स्वप्न बघत आलोय.असं त्यांनी सांगितले.
 
त्यांनी पदवी समारंभाच्या वेळी आपल्या या स्वप्ना बद्दल सांगितले होते.ते लहान पणापासूनच खूप कुशाग्र बुद्धीचे होते.त्यांनी बघितलेले अंतराळात पार्क आणि हॉटेल करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या वाटचाली कडे गेले जात आहे.त्यांना देखील हे माहित नव्हते की त्यांचे हे स्वप्न पूर्ण होणार. 
 
त्यांची इच्छा पृथ्वीचे ग्लोबल वार्मिंग पासून संरक्षण करण्याची आहे या साठी त्यांनी बेझोस अर्थ फंड नावाची संस्था देखील बनविली आहे.येत्या 20 जुलै रोजी ते हा अंतराळाच्या प्रवास करणार असून त्यांचा हा प्रवास 11 मिनिटाचा असेल.