बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 11 मार्च 2019 (18:05 IST)

शरद पवार यांची माघार हा भाजपाचा पहिला विजय - मुख्यमंत्री

शरद पवार यांची लोकसभा निवडणुकीतून माघार घेणे म्हणजे लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पहिला विजय आहे, प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी एकदा म्हणाले होते की, शरद पवारांना बदललेल्या हवेचा लवकर अंदाज येतो, त्यानुसारच त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलाय आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
 
जेष्ठ नेते आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांची उमेदवारी जाहीर केली. पार्थ पवार ने लोकसभेला उभे राहावं असा आग्रह सगळ्या स्तरातून होत असल्याने तो उमेदवार असल्याचं पवारांनी स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून लढण्याची घोषणा काही दिवसांपूर्वी केली. पण या निर्णयाबाबत आज पवारांनी आज स्पष्टिकरण दिलं. त्या आधी त्यांनी बारामती हॉस्टेलला माढातल्या नेत्यांसोबत बैठक घेतली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पवारांनी आपण उभे राहणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.