1. वृत्त-जगत
  2. »
  3. निवडणूक
  4. »
  5. लोकसभा निवडणूक
Written By भाषा|

डाव्यांनाही पराभव मंजूर

काही झाले तरी तिसरी आघाडी कॉग्रेससोबत जाणार नसल्याचे ठणकावून सांगणाऱ्या डाव्या पक्षांचे डोळेही आता कॉग्रेस आणि सहकारी पक्षांच्या विजयाने दिपले आहेत.

कॉग्रेस बद्दलची आपली भूमिका मवाळ करत यूपीएचा विजय आपल्याला मान्य असल्याचे मत माकप नेते प्रकाश करात यांनी व्यक्त केले आहे.

2004 च्या निवडणुकांच्या मानाने यंदा डाव्यांना कमी जागा मिळाल्या असून, याचे आत्मपरीक्षण करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.