रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: मंगळवार, 18 सप्टेंबर 2018 (00:07 IST)

40 टक्के कर्मचारी कामे करतच नाही

जगातील 86% म्हणजे 10 पैकी 9 कर्मचाऱ्यांचा वेळ हा अनावश्यक कामे करण्यात निघून जातो. हा खुलासा क्रोनोजच्या सर्व्हे करण्यात आला आहे. 41 टक्के फूल टाइम असलेले कर्मचारी हे चुकीच्या कामात आपला वेळ घालवतात. तर 40 टक्के कर्मचारी हे अशी काम करतात ज्याचा फायदा त्यांना किंवा त्यांच्या संस्थेला होतच नाही. हा सर्व्हे ऑस्ट्रेलिया, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, भारत, मॅक्सिको आणि ब्रिटनमध्ये 2800 कर्मचाऱ्यांवर 31 जुलै ते 9 ऑगस्ट या काळात करण्यात आला आहे. 
 
सर्व्हेत अशी बाब समोर आली आहे की कॅनडात 32 टक्के, अमेरिकेत 44 टक्के आणि ऑस्ट्रेलियात 47 टक्के लोक अधिक काम करण्यामुळे दबाव निर्माण होत असल्याचं सांगतात. सर्व्हेत मोठा खुलासा, सर्वाधिक वेळ म्हणजे 27 टक्के वेळ हा फक्त मिटींग करण्यात जातो. प्रशासकिय कार्यात 27 टक्के मिटिंगमध्ये जातो तर 26 टक्के वेळ सहकाऱ्यांशी बोलण्यात जातो तर ई मेल आदान प्रदान करण्यात 26 टक्के निघून जातात. तर महत्वाची बाब म्हणजे 22 टक्के लोकं ही चर्चा करण्यात खालवतात.