शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शुक्रवार, 30 जुलै 2021 (12:19 IST)

'कॅप्टन कूल' एमएस धोनी एका नव्या रूपात दिसला, सोशल मीडियावर चित्रे व्हायरल झाले

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या क्रिकेटच्या मैदानापासून दूर असले तरी ते नेहमीच आपल्या चाहत्यांमध्ये चर्चेत आहे.पुन्हा कॅप्टनकूल म्हणून ओळखले जाणारे महेंद्र धोनी यांचे नवीन लूक चाहत्यां समोर आले आहेत. हे त्यांचे नवीन लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
 
केश रचनाकार आलिम हकीम यांनी आपल्या इंस्टाग्राम हँडलवर काही छायाचित्रे पोस्ट केली होती.ज्यामध्ये त्यांनी केलेली केश रचना होती.त्या छायाचित्रांमध्ये त्यांनी महेंद्र सिंग धोनी यांची केश रचना देखील दाखविण्यात आली होती.धोनी यांच्या चाहत्यांना धोनीची ही नवीन केशरचना आनंद देणारी असण्याचे समजत आहे.
 
धोनी यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.ते सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात.लवकरच धोनी हे युएई मधील आयपीएलच्या दुसऱ्या भागात चेन्नई सुपर किंग संघात सामील होणार असून लवकरच पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर दिसणार आहे.
 
अलीम हकीम हे सुप्रसिद्ध हेयरस्टायलिस्ट आहे. बॉलिवूडचे मोठे स्टार असो किंवा टीम इंडियाचे खेळाडू असो सर्व हकीम यांच्या कडे केश रचना करण्यासाठी जातात.