बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: बुधवार, 6 जून 2018 (14:46 IST)

‘काला’ला सुरक्षा द्या, कोर्टाचा आदेश

सुपरस्टार रजनीकांत यांनी कावेरी नदीच्या पाणी वादावरून केलेल्या वक्तव्यामुळे कर्नाटकात त्यांचा आगामी चित्रपट ‘काला’विरोध होत आहे. या चित्रपटाचे प्रदर्शन सुरळीत होण्यासाठी या चित्रपटाचा निर्माता व रजनीकांत यांचा जावई धनुष याने न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने कर्नाटकातील चित्रपटगृहात काला या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्यावेळी सुरक्षा देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच न्यायालयाने हा चित्रपट प्रदर्शित होणाऱ्या सर्व चित्रपटगृहांची व वितरकांची नावे न्यायालयात सादर करायला सांगितली आहेत.
 
रजनीकांत यांनी कर्नाटक निवडणूकीचा निकाल येण्यापूर्वी कावेरी नदीच्या पाण्यावरून वादग्रस्त वक्तव्य केले होते.‘कर्नाटकमध्ये सरकार कोणाचेही येवो पण कर्नाटकला तामिळनाडूसाठी पाणी सोडावेच लागणार आहे.’असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून कर्नाटकमधील त्यांचे चाहते नाराज झाले होते. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर जर जनतेकडून किंवा बंदीची मागणी करणाऱ्या संघटनांनी काही अघटीत प्रकार केले तर चित्रपटगृहांचे नुकसान होईल म्हणून काही वितरकांनी या चित्रपटावर बंदी घालण्याला पाठींबा दिला होता. रजनीकांत यांचा ‘काला’हा चित्रपट येत्या शुक्रवारी सगळीकडे प्रदर्शित होणार आहे.