1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By

स्मार्टफोनच्या अत्यधिक वापरामुळे वाढल्या समस्या

स्मार्टफोनने आमचे जीवन भले सोपे केले आहे, पण याचा जास्त वापर केल्यामुळे आमच्या चेहर्‍यातील हसू गायब करून समस्या वाढवल्या आहेत. वॉशिंग्टनच्या जॉर्जटाउन विश्वविद्यालयाने एका अध्ययनानंतर दावा केला आहे की मोबाइल फोन तुमच्या चेहर्‍याचे हसू गायब करत आहे. शोधानुसार स्मार्टफोनच्या वाढत्या उपयोगामुळे लोक स्वत:मध्येच गुंतून राहत आहे आणि जास्त सामाजिक होत नाही आहे. कोस्तादिन कुशलेव यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या अध्ययनात असे आढळून आले की, 'स्मार्टफोनमुळे लोक आपल्या आजू बाजूच्या वातावरणात कमी फारच कमी वेळ घालवत आहे. 'शोधकर्त्यांचे मानणे आहे की, 'माणसाच्या सामाजिक व्यवहारात स्माईल हे सर्वात आधारभूत वस्तू आहे.'
 
जर्नल 'कंप्यूटर्स इन ह्युमन बिहेवियर' मध्ये प्रकाशित एका इतर अध्ययनामध्ये असे देखील आढळले की स्मार्टफोन तुमच्या झोपेचा शत्रू देखील  बनला आहे. म्हणून मोबाइलचे बेडरूममध्ये नो एंट्री असायला पाहिजे. एका शोधानुसार जर तुम्ही बेडरूममध्ये मोबाइल फोनचा प्रयोग करत नसाल तर यामुळे तुमच्या जीवनाच्या क्वालिटीत सुधार होईल आणि तुम्ही जास्त आनंदी राहाल. जेव्हा तुम्ही मोबाइलला बेडरूममध्ये नेत नाही, तर यामुळे तुमची मोबाइलची लत कमी होऊन जाते.
 
अध्ययनाच्या दरम्यान किमान 300 लोकांना आपले परिजन, मित्र किंवा जोडीदारासोबत बाहेर जेवण्यास सांगण्यात आले. यातून काही लोकांना जेवणाच्या टेबलावर मोबाइल फोन ठेवण्याची अनुमती देण्यात आली. नंतर लोकांनी स्वीकार केले की मोबाइलमुळे त्यांचे मन विचलित झाले आणि त्यांनी आपल्याबरोबर आलेल्या लोकांबरोबर क्वालिटी टाइम घालवला नाही.