बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: बुधवार, 17 ऑक्टोबर 2018 (16:10 IST)

मनमोहक रांगोळी

पाचोरा तालुका शिवसेना महिला आघाडीच्या वतीने २१०० किलो रंगीबिरंगी रांगोळीच्या माध्यमातून ८० फूट लांब व ४१ फूट रुंद अशी भव्य दिव्य अत्यंत विलोभनीय जगदंबा मातेची मूर्ती साकारण्यात आली आहे. शिवसेना आमदार किशोर पाटील यांच्या पत्नी सुनीता पाटील यांच्या संकल्पनेतून अभिनव पद्धतीने जगदंबा माता नवरात्र महोत्सव साकारण्यात आला आहे. जगदंबा मातेची भव्य रांगोळी जितेंद्र काळे, राहुल पाटील, सुबोध कांतायन, निरंजन शेलार, या कलाकारांनी ६ दिवसांच्या अथक परिश्रमातून साकारली आहे. दुष्ट शक्तींचा नाश करणारी, माता-भगिनी चे रक्षण करणारी, अखंड विश्वाची ही माता असल्याचे यामधून दाखवण्यात आले आहे.