रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: सोमवार, 4 जून 2018 (17:13 IST)

राविनाची शेतकऱ्यांवर टीका नेटीझन्स ने जोरदार फटकारले

प्रसिद्धीत राहण्यासाठी अनेक पडेल कलाकार नेहमी वाद निर्माण करतात. असाच प्रकार पडीक अभिनेत्री रवीना टंडन ने केला आहे. सध्या सुरु असलेल्या देशव्यापी शेतकरी संपावर तिने टीका केली आहे. तिने शेतकरी वर्गाला फटकारले आहे. सोशल मीडियावर तिने जोरदार टीका सुरु केली आहे ती म्हणतेय की  दोलक शेतकऱ्यांना तुरुंगात टाका, जामीनही देऊ नका असे ट्विट अभिनेत्री रविना टंडनने केले आहे. आंदोलन करताना शेतकरी शेतमालाची नासाडी करतात, आंदोलन करताना सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले जाते त्यामुळे तातडीने आंदोलक शेतकऱ्यांना अटक केले जावे आणि त्यांना जामीनही दिला जाऊ नये असे ती म्हणत आहेत. यावर तिच्यावर टीकेची झोड उठली आहे. नेटकरी संतापले आहेत. शेतकऱ्यांना संपावर का जावे लागते हे जाणून घेण्यासाठी शेतकऱ्याच्या घरी जन्म घ्यावा लागतो. ज्यांना शेतीबाबत काहीही ठाऊक नाही त्यांनी आपली अक्कल पाजळू नये असे अरूण गायकवाड या नेटकऱ्याने म्हटले आहे. तर तुम्हाला महालात राहून शेतकऱ्यांची व्यथा काय कळणार? असा प्रश्न मुनीश जैन या नेटकऱ्याने विचारला आहे. तर गणेश सुरवसे या नेटकऱ्याने रविना टंडन यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतचे फोटो पोस्ट केले आहेत. तुम्ही या लोकांसाठी शेतकरी विरोधी भूमिका घेतली आहे. तुमच्या घरातले कोणी शेतकरी असते तर तुम्ही असे बोलला नसतात. असे खडे बोल सुनावले आहेत. दैनिक लोकसत्ताने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे. रवीना सध्या रिकामी आहे तिला आता पूर्वी सारखे काम मिळत नाही. त्यामुळे ती अशी प्रसिद्धी मिळवत आहे असे काही म्हणत आहेत. 

 

 

What a sad thing to happen . Terrible way to protest. Any harm to public property,transport or commodities,should be instantly arrested and jailed without bail . https://twitter.com/dna/status/1002467780912766976 

  •