बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक २०२४
  3. लोकसभा निवडणूक २०२४ बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 मे 2024 (21:27 IST)

पंतप्रधान मोदी यांची सभा शिवतीर्थावर सभेतून उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका

modi in fatehpur
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी निवडणुका होणार आहे.लोकसभाच्या या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींची शिवतीर्थावर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत मोदींनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे. ते म्हणाले , हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांना तिलांजली देत नकली शिवसेनेचे नेते  काँग्रेस पक्षाच्या नेत्याच्या मांडीला मांडी लावून बसले आहे. 

मुंबई हे एक ड्रीम शहर असून इथे येणार प्रत्येक जण एक स्वप्न घेऊन आला असतो.भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महात्मा गांधी यांनी कॉंग्रेस पक्षाला विसर्जित करण्यास सांगितलं होते पण कॉंग्रेस सरकारने या देशातील संपत्तीला लुटले.भाजप सत्तेत आल्यावर देशाची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर पोहोचली आहे. तिसऱ्यांदा भाजप सत्तेत आल्यावर भाजपची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल.
 
 मागच्या 500 वर्षांपासून अयोध्येतील राम मंदिर बनले नव्हते. भाजप सरकारने अयोध्येतील राम मंदिर बांधले. मागील 70 वर्षांपासून कॉंग्रेस सरकारने स्वतःच्या स्वार्थासाठी कलम 370 हटविले नव्हते, पण भाजप सरकारने कलम 370 हटवले आणि काश्मिरी लोकांना न्याय दिला. 2019 साली महाराष्ट्रातील जनतेने भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या युतीला सरकार बनविण्यासाठी मतदान केले होते. पण भारतीय जनता पार्टीला फसवून उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी सत्ता काबीज केली.पंतप्रधान नरेंद मोदी यांची शिवतीर्थ येथे सभा होत आहे. 

 या सभेला मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार,राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार,मनसे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे,रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार , महायुतीचे पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित आहे. 
 
Edited by - Priya Dixit