शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. »
  3. हिंदू
  4. »
  5. कुंभमेळा
Written By भाषा|

हरिद्वारला पहिले शाही स्नान उत्साहात

PR
PR

महाशिवरात्रीच्या पावन पर्वनिमित्त हरिद्वार येथे महाकुंभमेळ्यात पहिले शाही स्नान उत्साहात पार पडले. अखाड्यातील साधुच्या स्नानास सकाळी साडे 10 वाजेपासून प्रारंभ झाला होता. पहिले शाही स्नानात सुमारे एक लाखापेक्षा अधिक साधु सहभागी झाले होते.

पहिले शाही स्नानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू म्हणून येथील स्थानिक प्रशासनाने चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली होती. केंद्रीय अर्द्धसैनिक बलासह सुमारे 15 हजार सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले होते. पुढील शाही स्नान 15 मार्च व 14 एप्रिल रोजी क्रमश:सोमवती अमावस्या व बैसाखीला होणार आहे.