गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: सोमवार, 28 ऑक्टोबर 2019 (13:27 IST)

अजित पवारांची विक्रमी विजयानंतर पहिली प्रतिक्रिया; म्हणाले कि….

बारामती – बारामती विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार अजित पवार यांनी रेकॉर्डब्रेक विजय संपादन केला. 1,95,641 मतांचे विक्रमी मताधिक्‍य मिळवित अजित पवार विजयी झाले आहेत. अजित पवार यांच्या विजयामुळे भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांचा दारुण पराभव झाला. ‘विधानसभा निवडणुकीत भाजपाने माझ्यासमोर सक्षम उमेदवार उभा केला होता. त्यामुळे निवडणुकीपूर्वी मताधिक्याचे आकडे मी दबकत-दबकत सांगत होतो’, असे अजित पवारांनी सांगितले. विजयानंतर अजित पवार यांनी पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधला.
 
अजित पवार म्हणाले कि, विधानसभा निवडणुकीत भाजपने माझ्यासमोर सक्षम उमेदवार उभा केला होता. यामुळे निवडणुकीपूर्वी मताधिक्याचे आकडे मी दबकत-दबकत सांगत होतो. पण, मतदारांनी मला मोठा आशीर्वाद दिला. पक्षांतर केलेले अनेकजण पडले, यामुळे त्यांनी आत्मपरिक्षण करावे. पुढील काळात विरोधी पक्षाची भूमिका अधिक चांगल्याप्रकारे निभावू, असेही त्यांनी सांगितले.
 
दरम्यान, स्थानिक उमेदवारांना डावलत मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिली. पडळकर यांच्या पाठीशी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ताकत लावली असले तरी स्थानिक उमेदवारी न मिळाल्याने स्थानिक नेते मात्र नाराज राहिले. निवडणुकीत स्थानिक नेते नसल्याने त्याचा परिणाम देखील भाजपच्या उमेदवारावर झाला. 2014च्या विधानसभा निवडणुकीपेक्षा 50 टक्‍के मतांची घट यंदाची निवडणूक किती झाली. दुसरीकडे आयात उमेदवाराला नाकारत अजित पवार यांना लाखापेक्षा अधिक मताधिक्‍य मिळवून देण्याचा चंग बारामतीकरांनी बांधला होता, अन्‌ तो प्रत्यक्षातही  आणला. बारामती मतदारसंघात विरोधी सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाल्यामुळे प्रथमत: इतिहास घडला आहे