बुधवार, 4 ऑक्टोबर 2023
  1. धर्म
  2. हिंदू
  3. मंगळ देव
Written By
Last Modified: मंगळवार, 21 मार्च 2023 (09:05 IST)

मंगळग्रह मंदिरातर्फे भाविकांसाठी ऑनलाइन बुकिंग व पेमेंटची सुविधा

अमळनेर (जिल्हा जळगाव महाराष्ट्र)- येथील मंगळग्रह मंदिर हे  अतिप्राचीन,अतिदुर्मिळ आणि अतिजागृत देवस्थानांपैकी एक मंदिर आहे. महाराष्ट्रासह, भारतभरातील भाविक आपल्या श्रद्धेमुळे येथे दर्शन व अभिषेकासाठी येत असतात. यामुळे भाविकांच्या सोयीसाठी मंदिरातर्फे आता ऑनलाईन अभिषेक बुकिंगची व पेमेंटची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. भाविकांना अभिषेकासाठी व दर्शनासाठी मंगळग्रह मंदिरावर यायचे असेल तर घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने अभिषेक बुकिंग व पेमेंट करता येणे सहज शक्य झाले आहे.

ऑनलाइन बुकिंग करण्यासाठी गुगल वर जाऊन mangalgrahamandir.com या लिंकवर क्लिक केल्यानंतर अभिषेक बुकिंग साठीचा फॉर्म भाविकांना दिसेल, हा फॉर्म भरल्यानंतर आपल्याला तात्काळ पावती देखील मिळेल,सदर पावती मोबाईल मध्ये सेव करून मंदिरातील बुकिंग काउंटरवर दाखविल्यास तात्काळ अभिषेक स्वीकारले जाणार आहेत. यामुळे दूरवरून येणाऱ्या भाविकांना अत्यंत सोप्या पद्धतीने अभिषेक पावती मिळविणे सोपे झाले आहे. मंगळवारी अभिषेकासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने येथे आल्यानंतर आता भाविकांना रांगेत उभे राहून अभिषेक पावती काढण्याची आवश्यकता नाही जे भाविक लांब पल्ल्यावरून येत असतील त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अभिषेक बुकिंग करून अभिषेक करावेत असे आवाहन मंगळग्रह सेवा संस्था तर्फे करण्यात आले आहे.