रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: शनिवार, 5 जून 2021 (16:12 IST)

नारायण राणे मुख्यमंत्री होते तेव्हा का आरक्षण दिलं नाही? - अजित पवार

शरद पवार चारवेळा मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणाचा निर्णय का घेतला नाही? असा प्रश्न विचारणाऱ्या माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी अजित पवार यांनी उत्तर दिले आहे.
 
"नारायण राणे मुख्यंमत्री होते, तेव्हा त्यांनी का नाही दिलं आरक्षण? ही काय पद्धत झाली का? हे इतक्यावेळी मुख्यमंत्री होते, ते तितक्यावेळी मुख्यमंत्री होते," असं म्हणत अजित पवारांनी राणेंवर निशाणा साधला. 
 
"इतरवेळी म्हणायचं शरद पवार आमचे नेते आहेत, शरद पवारांचं वाकून दर्शन घ्यायचं आणि नंतर आपण काहीतरी वेगळं सांगतोय, असं करून शरद पवारांबद्दल अशाप्रकारचं वक्तव्य करायचं," असंही अजित पवार राणेंना उद्देशून म्हणाले.
 
कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिकाच राष्ट्रवादी काँग्रेसची असल्याचंही अजित पवार म्हणाले.