रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By

बांगडी, पैंजण, जोडवी, केवळ सौभाग्याच्या वस्तू नाही, आरोग्यासाठी फायदेशीर

स्त्री आणि पुरुष एकमेकांचे पूरक आहे परंतू निर्सगाने दोघांचे वेगळे स्वरूप आखले आहेत. मन आणि तन यात स्त्री पुरुषापेक्षा वेगळी आहे. स्त्री संवेदनशील असते. अपेक्षाकृत पुरुष कठोर. बाह्य स्वरूपातही त्यांची प्रकृती वेगळी आहे. त्यांच्यात हार्मोंसच्या चढ-उताराचा प्रभाव असतो.
 
प्राचीन ऋषींनी असे काही साधन निर्मित केले ज्याने मन आणि आरोग्याची रक्षा होऊ शकते. प्रस्त वाढल्याने यांना सुंदर दागिन्याचा रूप मिळाला आणि हे नियमपूर्वक घातले जाऊ लागले. जाणून घ्या काय फायदे आहेत या दागिन्यांचे...सोन्याचे दागिने उष्णता आणि चांदीचे दागिने थंड परिणाम देतात. कंबरेच्या वरील भागात सोन्याचे दागिने आणि कंबरेच्या खालील भागात चांदीचे दागिने घातले पाहिजे. हा नियम पाळल्याने शरीरात उष्णता आणि शीतलतेचं संतुलन राहतं.
 
बांगडी घालण्याचे फायदे
बांगडी मनगटावर घासली जाते ज्याने हाताचं रक्त संचार वाढतं. हे घर्षण ऊर्जा व्युत्पन्न करतं ज्याने लवकर थकवा जाणवत नाही.
बांगडी घातल्याने श्वासासंबंधी आजार, हृदयासंबंधी आजार होण्याची शक्यता कमी होते.
बांगडी घातल्याने मानसिक संतुलन उत्तम ठेवण्यास मदत मिळते.
तुटलेली बांगडी घालू नये. याने नकारात्मक ऊर्जा वाढते.
 
जोडवी घालण्याचे फायदे
विवाहित स्त्रिया पायाच्या तीन बोटांमध्ये जोडवी घालतात. हा दागिना केवळ शृंगाराची वस्तू नाही. दोन्ही पायात जोडवी घातल्याने हार्मोनल सिस्टम योग्य रित्या कार्य करतं.
जोडवी घातल्याने थायरॉईडचा धोका कमी असतो.
जोडवी ऍक्युप्रेशर उपचार पद्धतीवर कार्य करतात ज्याने शरीराचे खालील अंगाचे मज्जासंस्था आणि स्नायू मजबूत राहतात.
जोडव्यांमुळे एका विशिष्ट रक्तवाहिनीवर दाब निर्माण होत असल्यामुळे गर्भाशयाला रक्तपुरवणा सुरळीत होतो. या प्रकारे जोडवी स्त्रियांची गर्भधारण क्षमता निरोगी ठेवते.
याने मासिक पाळी नियमित होते.
 
पैंजण घालण्याचे फायदे
पैंजण पायातून निघणार्‍या शारीरिक विद्युत ऊर्जा शरीरात संरक्षित ठेवते.
पैंजण स्त्रियांच्या पोट आणि खालील भागातील अंगात फॅट्स कमी करण्यात मदत होते.
वास्तुच्या मते पैंजणातून येणारा स्वराने नकारात्मक ऊर्जा दूर होते.
चांदीची पैंजणाचे पायाला घर्षण होत असल्याने पायाचे हाड मजबूत होतात.
पायात पैंजण घातल्याने महिलांची इच्छा-शक्ती मजबूत होते. याच कारणामुळे स्त्रिया स्वत:च्या आरोग्याची काळजी न करता कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यात दिवस घालवून देते.
पायात सोन्याची पैंजण घालू नये. याने शारीरिक उष्णतेचे संतुलन बिघडून आजार होण्याची शक्यता असते.