रविवार, 26 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 28 जुलै 2018 (15:15 IST)

बॉडीपाट्‌र्सवर लावा पर्फ्यूम, सुगंध दिवसभर दरवळेल

महागडा पर्फ्यूम लावूनही सुगंध जास्त काळ टिकत नसल्याची अनेकांची तक्रार असते. पण केवळ महागडे पर्फ्यूमच जास्त सुगंध देतात असं नाही. पर्फ्यूम लावताना बॉडीपाट्‌र्सचेही महत्त्व असते. शरीरातील काही भागात पर्फ्यूम लावल्याने सुगंध जास्त काळ टिकतो. कारण शरीरातील या भागातून गरमी बाहेर पडते आणि सुगंध देत राहते. शरीराच्या कोणत्या भागाला पर्फ्यूम लावल्याने जास्त काळ सुगंध राहतो हे जाणून घेऊया... 
 
नाभी- नाभी हा शरीराच्या गरम भागांपैकी एक मानला जातो. इथे पर्फ्यूम लावल्यास तो जास्त वेळ दरवळत राहतो. मी नाभीवर पर्फ्यूम लावते असे अमेरिकेची टीव्ही अभिनेत्री लिव टाइलरने एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. मी काही थेंब बोटांवर घेते आणि काही अंडरगार्म्स आणि नाभीतही असेही तिने यावेळी सांगितले. 
 
केसांवर- केस आपल्या शरीराच्या वरच्या भागात असल्याने यातूनही सुगंध वाहण्यास मदत होते. आपला आवडता पर्फ्यूम केसांध्ये सोडल्यास उशिरापर्यंत दूरवर सुगंध दरवळत राहतो. 
कानाच्या मागे- कानाच्या मागील भागातील नस या स्किनच्या जवळ असतात आणि सुगंध पसरवण्यास सोयीस्कर ठरतात. 
 
कोपर- कोपराच्या जवळ तुम्ही घामाचे थेंब पाहिलेयत का? शरीराच्या या भागातून गर्मीमुळे जास्त घाम निघतो. हीच गरमी आपल्या पर्फ्यूमचा सुगंध असरदार बनवते. 
 
गुडघ्यामागे- कोपराप्रमाणे गुडघ्याच्या मागच्या भागातही खूप घाम निघतो आणि इथे पर्फ्यूम लावल्याने खूप सुगंध येतो.