शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: सोमवार, 10 मे 2021 (12:23 IST)

कुंकुमादि तेल : चेहरा होईल चमकदार, त्वचेचे तारुण्य टिकून राहील

कुंकुमादि तेल केशर ऑयल म्हणून देखील ओळखलं जातं. यात 26 घटकांचं अद्भूत मिश्रण असतं ज्याने त्वचेवरील चमक कायम टिकून राहते. यात अँटीऑक्सिडेंट्स, अँटी हायपरपिगमेंटशन, मॉइश्चराइजर, हेमल्सेण्ट, अँटीबॅक्टीअरयल, अँटी इंफ्लेमेटरी, अँटी मायक्रोबियल, अँटी प्रुरितिक, नैसर्गिक सनसक्रीन गुण आढतात.
 
दररोज त्वचेला पर्यावरणाचे घातक जसे ऊन, वारं, धूर, धुळ आणि शुष्क वातावरणाला लढा द्यावा लागतो. परिणामस्वरुप त्वचेवर काळे डाग, मुरुम, टोनिंग समस्या उद्भवते. कुंकुमादि तेल त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. 
 
हायपरपिग्मेंटेशन
कुंकुमादि तेलाने त्वचा चमकदार होते आणि‍ पिग्मेंटेशन कमी होण्यास मदत होते. यात आढळणारे एपिडर्मल इंफ्लेमेटरी प्रभावामुळे हे शक्य होतं. यात अँटीऑक्सिडेंट्स, अँटी हायपरपिगमेंटशन, अँटी इंफ्लेमेटरी, गुण असल्यामुळे रासायनिक प्रक्रियेमुळे उत्तपन्न सूज कमी होण्यास मदत होते. हे मेलेनिन पिग्मेंटचे निर्माण रोखण्यास मदत करतं.
 
सनसक्रीन
या तेलात केशर पराग कण असतात. हे नैसर्गिक रुपात सनस्क्रीनचं कार्य करतात. याने त्वचेवर मॉइस्चराइजरचा प्रभाव पडतो. केशर पराग युक्त लोशन अँटी सोलर प्रभावासाठी उपयुक्त असून यूव्ही किरणांना अवशोषित करुन त्वचेची रक्षा करण्यास मदत करतं.
 
पिंपल्स
यात अँटीबायोटिक, अँटीऑक्सिडेंट आणि अँटीइंफ्लेमेटरी गुण आढळल्यामुळे पिंपल्सवर उपचार करता येतं. यात हलकं क्लिजिंग प्रभावामुळे मुरुमावर आराम पडतो. याने नियमित मालीश केल्याने मृत कोशिका बाहेर पडतात आणि त्वचेच्या वसामय ग्रंथी संक्रमण रोखण्यास मदत होते. याने पिंपल्सची लाली कमी होण्यास मदत होते. 
 
डाग
त्वचेवरील काळे डाग मिटवून रंग सुधारण्यास तेल मदत करंत. पिंपल्सचे डाग मिटण्यास देखील मदत होते. त्वचेवरील सूज कमी होते. या तेलामुळे नैसर्गिक रंग मिळण्यास मदत होते. नियमित वापरल्याने त्वचेवरील डाग नाहीसे होतात.
 
इतर फायदे
यात हळद आणि चंदन असतं ज्याने त्वचा टोन हलकी होण्यास मदत होते. डोळ्याखाली काळे वर्तुळ हटविण्यास मदत होते. त्वचेला पोषण मिळतं. चेहर्‍याचे स्नायू नरम होतात. त्वचेवरील चमक कायम टिकून राहते. हे अँटी एजिंगचं काम करतं आणि याचा वापर केल्याने त्वचेचं तारुण्य टिकून राहतं. त्वचेचं ब्लड सर्कुलेशन सुधारतं.