जर घरात नेगेटिव एनर्जी असेल तर सांगेल हा 'टोटका'
आमच्या घरात आणि वैयक्तिक जीवनात सुख-शांती फार गरजेची आहे. जर असे नसेल तर व्यक्ती चिंताग्रस्त राहू लागतो आणि बर्याच वेळा याचा परिणाम फारच घातक देखील होऊ शकतो. मुख्य म्हणजे, घरात नेगेटिव एनर्जी (नकारात्मक ऊर्जा) असल्याने काहीच चांगले होत नाही. कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद, भांडण इत्यादी होऊ लागतात. तसेच एका नंतर एक समस्या येऊ लागतात.
नेगेटिव एनर्जीचे संकेत
तुम्ही नेहमी निराश आणि बेचैन राहू लागता. घरातील वातावरण खराब होणे, तसेच कोणत्याही कामासाठी प्रयत्न करण्याआधीच तुमच्या मनात अपयशाची भावना येऊ लागते. अशा गोष्टी सारख्या होऊ लागल्यातर हे नेगेटिव एनर्जीचे संकेत असू शकते.
नेगेटिव एनर्जी जाणून घेण्यासाठी टोटका
घरात नेगेटिव एनर्जी आहे का हे जाणून घेण्यासाठी एक ग्लास पाणी भरून त्यात समुद्री मीठ टाकावे. त्याला घरातील एखाद्या कोपर्यात ठेवून द्यावे, जेथे कोणाचे लक्ष पडू नये. लक्षात ठेवण्यासारखे म्हणजे यावर तुमची देखील नजर पडू नये. 24 तासानंतर जर पाण्याचे रंग गुलाबी झाले तर तुमच्या घरात नेगेटिव एनर्जी आहे, अन्यथा ही तुमची शंका मात्र आहे.