जेव्हा पूजेचे नारळ खराब निघत तेव्हा देव नाराज होतो का?
तुमच्या बरोबरही कधी असे झाले आहे का, की जे नारळ तुम्ही पूजेत ठेवले होते ते खराब निघाले. कधीतरी तर तुमच्यासोबत असे नक्कीच झाले असेल, तेव्हा दुकानदारावर राग ही येतो आणि मन बेचैन होऊन जात. अशुभ झाले, देव नाराज झाले किंवा एखादा अपघात होईल अशी शंका सारखी मनात येत राहते. पण पूजेचे नारळ खराब निघाले तर ते अशुभ नसते, जाणून घ्या याच्या मागचे कारण....
नारळ हे लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. आणि तिच्या पूजेत नारळ असणे फारच गरजेचे असते.
जर हे नारळ खराब निघाले तर याचा अर्थ असा नव्हे की काही अशुभ घडणार आहे, बलकी नारळाचे खराब होणे शुभ असत. खराब नारळाला शुभ मानायच्या मागे एक खास कारण आहे.
असे मानले जाते की नारळ फोडताना जर ते खराब निघाले तर याचा अर्थ असा की देवाने प्रसाद ग्रहण केला आहे. एवढंच नव्हे तर हे मनोकामना पूर्ण होण्याचे संकेत देखील आहे. या वेळेस तुम्ही देवासमोर तुमच्या मनातील कुठलीही इच्छा ठेवली तर ती नक्की पूर्ण होईल.
तसेच नारळ फोडताना ते चांगले निघाले तर त्याला सर्वांमध्ये वाटून द्यायला पाहिजे. असे करणे शुभ मानले जाते.