1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 21 जून 2017 (12:45 IST)

Vastu Tips : भूमी पूजन करताना का केली जाते सापाची पूजा

नेहमी आपण बघतो की जेव्हा कधी घर, पुल किंवा इमारतीचे निर्माण करण्यात येते तेव्हा सर्वात आधी त्या जागेची पूजा केली जाते. हिंदू धर्मात भूमीपूजनाचे विशेष महत्त्व आहे आणि अशी मान्यता आहे की भूमी पूजन केल्याने भवन निर्माणात कुठल्याही प्रकारची समस्या येत नाही. पण याच्या मागचे कारण काय आहे, ते जाणून घ्या. 
  
वास्तुशास्त्रानुसार जमिनीच्या खाली पाताललोक आहे ज्याचे स्वामी शेषनाग आहे. त्यांनीच आपल्या फणावर संपूर्ण पृथ्वीचा भार सांभाळला आहे. यामुळेच भूमी पूजनाची परंपरा आहे.  
 
भूमी पूजनात चांदीचा साप आणि कलशाची पूजा केली जाते कारण आम्हाला शेषनागच्या कृपेची गरज आहे.  
 
भूमी पूजन करताना कलशात दूध, दही आणि तूप घालून शेषनागाची मंत्रांद्वारे पूजा केली पाहिजे. असे केल्याने शेषनागाचा  आशीर्वाद मिळतो.  
 
त्या शिवाय कलशात  एक नाणे आणि सुपारी घालून लक्ष्मी आणि गणपतीची पूजा करायला पाहिजे, असे केल्याने आमच्यावर लक्ष्मीची कृपा सतत राहते आणि घरात देखील सुख शांतीचे वातावरण राहतात.