बेमुदत बंदमुळे बाजार समित्यांमधला व्यवहार ठप्प
मुंबई- नाशिकमध्ये व्यापार्यांच्या मुदत बंदमुळे बाजार समित्यांमधला व्यवहार ठप्प पडला आहे. भाजीपाला बाजार समितीतून नियंत्रण मुक्त करण्यास व्यापाऱ्यांचा विरोध आहे. त्याचबरोबर आडत व्यापाऱ्यांकडून वसूल केली जावी, या निर्णयाविरोधात व्यापारी नाराज आहेत.
नाशिकमध्ये व्यापार्यांनी आजपासून बेमुदत संप पुकारलेला असताना, आता नवी मुंबई बाजार समितीही मंगळवारपासून बंद ठेवू, असा इशारा व्यापार्यांनी दिला आहे. स्थानिक शेतकर्यांना तात्पुरती शेड उपलब्ध करुन देण्यात आली आहे. जिथे शेतकरी आपला भाजीपाला विकताना दिसत आहेत. नाशिकसह, मनमाड आणि इतर अनेक ठिकाणच्या बाजार समित्यांमध्ये बंद पाळण्यात येतो आहे.