Last Modified: दिल्ली , गुरूवार, 13 ऑगस्ट 2015 (10:18 IST)
सोन्याला पुन्हा झळाळी
सोने आणि चांदीचे दर पुन्हा वधारले आहेत. सोन्याचा भाव २६ हजारांवर गेला आहे. जागतिक सराफा बाजारात सोन्याचा भाव प्रति औंस ११०० डॉलरवर होता. डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्याने सोन्याची आयात महागणार आहे.
दिल्ली सराफा बाजारात चांदीचा भावही ६४० रुपयांनी वधारत ३५,७०० रुपयांवर गेला. चांदीच्या व्यवसायातील उद्योगांनी आणि नाणे तयार करणाºयांनी खरेदी केल्याने चांदीची झळाळीही वाढली.