रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

मोठं गिफ्ट : एसबीआयने विविध लोनमध्ये केला बदल

सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियानं ग्राहकांना मोठं गिफ्ट दिलं आहे. यात  वाहन कर्जावरील प्रोसेसिंग फी शून्य केली आहे. त्यामुळे आता वाहन कर्ज घेणार असल्यास वाहन कर्जावर प्रोसेसिंग फीच्या नावे कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. तसेच बँकेचं पर्सनल लोन आणि एज्युकेशन लोन चा परतफेड कालावधी वाढवला आहे. आता आपण 6 वर्षांसाठीही पर्सनल लोन घेऊ शकता. 
 
बँकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, एसबीआयनं फेस्टिव्ह सीझन लक्षात घेता वाहन कर्जावरील प्रोसेसिंग फीस संपुष्टात आणली आहे.  फेस्टिव्ह सीझनच्या पार्श्वभूमीवर 20 लाख रुपयांपर्यंतचं वैयक्तिक कर्ज मिळते. त्यासाठी बँक आपल्याकडून 10.75 टक्के व्याजदर वसूल करते. SBIनं परतफेड कालावधीवाढवून 6 वर्षांचा केला आहे.  परदेशात शिकण्यास जाण्याची इच्छा असल्यास आता एसबीआयचं एज्युकेशन लोन फायदेशीर ठरणार आहे. 50 लाख रुपयांचं शैक्षणिक कर्जावर एसबीआय 8.25 टक्के व्याजदर वसूल करते. बँकेनं परतफेड कालावधी वाढवून 15 वर्षांचा केला आहे. याशिवाय  कर्जाच्या व्याजदरात 0.20 टक्के कपात केली आहे. 1 सप्टेंबरपासून गृह कर्जावरचं व्याजदर 8.05 टक्के होणार आहे. RBIने ऑगस्टमध्ये रेपो रेट कमी करून 5.40 टक्के केला आहे. त्यानंतर एसबीआयनं कर्जावरील व्याजदर घटवलं आहे.