शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 19 एप्रिल 2018 (15:52 IST)

विमानाला उशीर झाला, मग विमान कंपनीला दंड

आता नवीन नियमानुसार  कोणत्याही  एअरलाईन्सला उशीर झाला तर त्या कंपनीला त्याबदल्यात दंड भरावा लागणार आहे. प्रवासी वर्गाला होणाऱ्या त्रासासाठी  डीजीसीएने महत्वाचा प्रस्ताव समोर ठेवला आहे. यामध्ये प्रवाशांचे अधिकार आणि त्यांच्या जबाबदारीचा विचार केला जाणार आहे. एअरलाइन्सच्या प्रवाशांमुळे कनेक्टिंग फ्लाइट सुटण्याच्या घटना वाढल्या आहेत.

यामध्ये डीजीसीएने मांडलेल्या प्रस्तावानुसार एअरलाईनने 20 हजार रुपयांपर्यंतचे भरपाई  देणार आहे. प्रथमच  इतक्या रुपयांच्या भरपाईची प्रस्ताव मांडला आहे.  याचा लाभ अशा प्रवाशांना मिळणार आहे ज्यांची फ्लाई कॅन्सल झाल्यामुळे कनेक्टिंग फ्लाईट चुकणार आहे. नव्या आदेशानुसार, तिकीट असूनही प्रवास करू दिला नाही तर एअरलाईन्सला 5000 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.