शनिवार, 16 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 27 डिसेंबर 2016 (11:45 IST)

केरळच्या तीन कंपन्यांकडे आहे बर्‍याच श्रीमंत देशांपेक्षा जास्त सोने

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मुथूट फायनान्सवळ 150 टन सोने आहे. हे जगातील श्रीमंत देश सिंगापुर (127.4 टन), स्वीडन (125.7), ऑस्ट्रेलिया (79.9 टन), कुवैत (79 टन), डेनमार्क (66.5 टन) आणि फिनलँड (49.1 टन)च्या जवळ रिझर्व्हच्या रूपात साठवून ठेवलेले सोन्यापेक्षाही जास्त आहे. या प्रकारे मणप्पुरम फायनान्स आणि मुथूट फिनकॉर्पजवळ क्रमशः 65.9 आणि 46.88 टन सोने आहे.
 
जागतिक सोने बाजारपेठेतील ३० टक्के सोन्याची मागणी ही फक्त भारतातून होते. तर केरळमध्ये सुमारे २ लाख लोक सोने उद्योगात काम करतात. टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार दोन वर्षांपूर्वी मूथूट फायनान्सकडे ११६ टन (१,१६,००० किलो) सोने होते. आता ते १५० टनपर्यंत (१,५०,०००) पोहोचले आहे.