शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 ऑगस्ट 2021 (15:29 IST)

20 दिवसांपासून पेट्रोलचे दर स्थिर आहेत, डिझेलचे दर 21 व्या दिवशीही बदलले नाहीत

आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत तीन दिवसाच्या आलेल्या नरमी नंतर गुरुवारी वाढ होऊनही शुक्रवारी सलग 20 व्या दिवशी देशातील पेट्रोलचे दर स्थिर राहिले. डिझेलचे दरही सलग 21 व्या दिवशी तसेच  राहिले.त्यात काही बदल केले नाही. 
 
तेल विपणन कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या मते, शुक्रवारी दिल्लीत पेट्रोल 101.84 रुपये आणि डिझेल 89.87 रुपये प्रति लीटरवर राहिले. देशातील इतर शहरांमध्येही पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहिले.
 
30 जुलैला शेवटच्या आठवड्यात अमेरिकेच्या तेलाच्या साठ्यात वाढ झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमती कमी होत होत्या, पण गुरुवारी त्यात वाढ झाली.
 
दिल्लीमध्ये पेट्रोल 101.84 रुपये  तर डिझल 89.८७ रुपये प्रति लिटर आहे.
मुंबईत पेट्रोल 107.83 रुपये तर डिझल 97.45 रुपये प्रति लिटर आहे.
चेन्नईत पेट्रोल 102.49 रुपये तर डिझेल 94.39 रुपये प्रति लिटर आहे.
कोलकाता पेट्रोल102.08 रुपये तर डिझेल 93.02 रुपये प्रति लिटर आहे.
 
हे लक्षात घेण्यासारखे आहे की दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींचा आढावा घेतला जातो आणि त्या आधारावर दररोज सकाळी 6 पासून नवीन किंमती लागू केल्या जातात. पेट्रोल डिझेल देशातील सर्वोच्च पातळीवर कायम आहे.