रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर कायम

रिझर्व्ह बँकेने व्याजदर कायम ठेवत बाजाराला धक्का दिला आहे.  त्यामुळे गृह आणि वाहन कर्ज स्वस्त होण्याची शक्यता मावळली आहे. व्याजदर घटले असते तर, या दोन्ही क्षेत्रांना बळकटी मिळू शकली असती.

आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यीय समितीने रेपो रेट 6.25 टक्के आणि रिव्हर्स रेपो रेट 5.75 टक्के कायम ठेवला. 2016-17 मध्ये विकास दर 6.9 टक्के राहील असा अंदाज आरबीआयने वर्तवला असून, 2017-18 मध्ये विकास दरात प्रगती होईल असा आरबीआयचा अंदाज आहे.