कार उत्पादक कंपन्यांना मोठा झटका, BS-III वाहनावर बंदी
सर्वोच्च न्यायालयाने कार उत्पादक कंपन्यांना मोठा झटका दिला आहे. यात सर्वोच्च न्यायालयाने येत्या 1 एप्रिलपासून BS-III प्रकारात मोडणा-या वाहनांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. उत्पादकांच्या व्यावसायिक हितापेक्षा लाखो नागरीकांचे आरोग्य महत्वाचे आहे असे न्यायमूर्ती मदन बी लोकूर आणि न्यायामूर्ती दीपक गुप्ता यांनी आदेश देताना सांगितले. सरकारने 31 मार्चनंतर प्रदूषण वाढवणा-या BS III गाडयांच्या नोंदणीला परवानगी देऊ नये असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. BS-IV उत्सर्जनाचे नियम एप्रिलपासून लागू होणार हे कंपन्यांना माहित होते तरीही त्यांनी BS III तंत्रज्ञान बदलून BS-IV नुसार गाडयांचे उत्पादन करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत असे कोर्टाने म्हटले आहे.