शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 20 मे 2017 (16:46 IST)

सुपरफास्ट 'तेजस' 22 मे ला सीएसटीहून करमाळी धावणार

भारतीय रेल्वेच्या ताफ्यात सुपरफास्ट तेजस एक्स्प्रेस दाखल झाली असून  मुंबई ते गोवा प्रवास फक्त 8.30 तासात पुर्ण होणार आहे. ही सुपरफास्ट हायटेक ट्रेन 22 मे ला तेजस ट्रेन मुंबईच्या सीएसटीहून गोव्याच्या करमाळी स्टेशन असा प्रवास करणार आहे. सीएसटी स्थानकावर सोमवारी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू गाडीला हिरवा कंदील दाखवतील.  त्यानंतर मुंबई-अहमदाबाद, आनंद विहार-लखनौ आणि दिल्ली-चंदीगडमध्ये चालवण्यात येईल', अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली आहे. 
 
विशेष म्हणजे तेजस एक्स्प्रेस ताशी 200 किमी वेगाने धावणार आहे. इतक्या वेगाने धावणारी तेजस देशातील पहिलीच ट्रेन असेल. पावसाळ्यात मात्र या मार्गावर येणारे अडथळे पाहता ट्रेनला जास्त वेळ लागू शकतो. ट्रेनला एकूण 7 थांबे आहेत. सीएसटी, दादर, ठाणे, पनवेल, रत्नागिरी, कुडाळ, करमाळी या स्थानकांवर तेजस थांबेल. तेजस एक्स्प्रेसचा प्रत्येक डब्बा बनवण्यासाठी रेल्वेला तब्बल 3 कोटी 25 लाख रुपये खर्च करावे लागले आहेत. तेजसचे दरवाजे स्वयंचलित असतील. तेजस ट्रेन अत्याधुनिक असावी याची पुरेपूर खात्री घेण्यात आली आहे. ट्रेनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा, कॉल बेल, एलईडी टीव्ही, यूएसबी चार्जिंगची सुविधा असणार आहे. आठवड्यातून पाच वेळा ट्रेन धावणार आहे. तेजस ट्रेनचं भाडं शताब्दी ट्रेनच्या तुलनेत जास्त असेल.