गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 30 डिसेंबर 2023 (17:56 IST)

बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री सई लोकूरच्या लेकीचे बारसं

sai lokur
sai lokur instagram
बिगबॉस फेम अभिनेत्री सई लोकूर नेहमी चर्चेत असते. तीने 17 डिसेंबर रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला असून  सईच्या मुलीच्या बारस्याचे फोटो तिने शेअर केले आहे.सई नेहमी सोशल  मीडियावर एक्टीव्ह असते.  ती नेहमी तिच्या दैनंदिन घटना चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिने आई होण्याची माहिती सोशल मीडियावर दिली होती.नंतर तिने बेबीबंप चे फोटो देखील शेअर केले होते. आता सईच्या लेकीचे बारसे झाले

तिने लेकीच्या बारशाच्या सोहळ्याचे फोटो शेअर केले आहे. तिने घराला छान सजवले असून पाळण्याच्या भोवती छान सजावट केली आहे.तिने व तिच्या पती तीर्थदीप रॉय ने या सोहळ्याला पांढरे रंगाचे कपडे घातले असून Happy And Proud New Parents’ ',असे कॅप्शन फोटोला दिले आहे. सई आणि तिच्या नवऱ्यावर बारशाच्या सोहळ्या निमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.पण नेमके सईने तिच्या मुलीचे नाव सांगितले नाही त्यामुळे बाळाचे नाव काय ठेवले नेटकरी असा प्रश्न विचारत आहे.   
 
Edited By- Priya DIxit