रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 28 ऑक्टोबर 2023 (14:05 IST)

चला हवा येऊ द्या’ कार्यक्रम घेणार प्रेक्षकांचा निरोप

Chala Hawa Yeu Dya
झी मराठी वरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम गेल्या 9 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मराठमोळ्या विनोदी कार्यक्रमाच्या सर्व कलाकारांना भरभरून लोकप्रियता मिळाली. या कार्यक्रमातील सर्व कलाकार प्रेक्षकांच्या घर-घरात आणि मनात पोहोचले. आता हा कार्यक्रम प्रेक्षकांचा कायमचा निरोप घेणार आहे. अशी माहिती मिळाली आहे. 
 
2014 साली लयभारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने या मधील सर्व कलाकार एकत्र आले आणि कार्यक्रम प्रेक्षकांसमोर सादर केला. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन निलेश साबळे हे करत होते. या कार्यक्रमाला प्रेक्षकांची चांगलीच दाद मिळाली नंतर या कार्यक्रमाला हवा येऊ द्या चे रूप मिळाले.तेव्हा पासून हे  प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. आता हा कार्यक्रम नोव्हेंबर पासून बंद होणार आहे.सुरुवातीला या कार्यक्रमाने प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं मात्र कालांतराने या कार्यक्रमाची रंगत कमी झाली आणि टीआरपीच्या यादीतून हा कार्यक्रम घसरला. विविध योजना आखून देखील या कार्यक्रमाला पाहिजे तसे यश मिळाले नाही म्हणून आता अहा कार्यक्रम नोव्हेंबर पासून कायमचा बंद होण्याचे समोर आले. 
 
Edited by - Priya Dixit