मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 22 डिसेंबर 2020 (15:35 IST)

‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर'च्या मंचावर गोविंदा

सोनी मराठी वाहिनीवर महाराष्ट्राज बेस्ट डान्सर हा कार्यक्रम थोड्याच काळात प्रेक्षकांचा आवडता झाला आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यामतून आलेली नृत्यातीली प्रतिभा प्रेक्षकांना या मंचावर पाहायला मिळतीय.
 
22 डिसेंबरला रात्री 9 वाजता महाराष्ट्राज बेस्डान्सरमध्ये हिरो नंबर वन गोविंदा उपस्थित असणार आहे. गोविंदाच्या उपस्थितीमुळे स्पर्धक आणि गुरू यांच्यातील उत्साह वाढला आहे. या आठवड्यात होणारी सगळी सादरीकरणं गोविंदाला समर्पित असणार आहेत. गोविंदासाठी खास ट्रिब्यूटही सर्व स्पर्धक आणि त्यांचे गुरू यांनी सादर केलेले पाहायला मिळणार आहे.
 
गोविंदाच्या आयकॉनिक स्टेप्स नृत्याचा महामंचावर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. धर्मेश स्वतः गोविंदाचे चाहते असल्याने गोविंदाच्या उपस्थितीनं तेही भारावून गेले होते. स्पर्धकांमधील आर्य डोंगरे याच्या आजोबांनी जमवलेल्या गोविंदाच्या आईच्या आवाजातली दुर्मीळ चित्रफीत ही महाराष्ट्राज बेस्ट डान्सर टीमकडून भेट म्हणून देण्यात आली. बाद फेरीचा पहिलाच आठवडा आहे. या भागात टॉप 12 पैकी कोणता एक स्पर्धक बाद होणार, हे कळणार आहे.