शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By

मल्याळम चित्रपटाचा मराठी रिमेक 'कोल्हापूर डायरीज'

अंगमाली डायरीज हा मल्याळम चित्रपट गेल्‍या वर्षी प्रदर्शित झाला.  आता या चित्रपटाचा मराठीत रिमेक येत आहे. या चित्रपटाचे नाव 'कोल्हापूर डायरीज' असे आहे. या चित्रपटाची घोषणा गायक अवधूत गुप्तेने सोशल मीडियावर दिली आहे. तसेच चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी या चित्रपटाबाबतची काही माहिती ट्विटरवर शेअर केली आहे.  तरण आदर्श यांनी ट्विअवधूत गुप्ते व वजीर सिंग 'कोल्हापूर डायरीज' या चित्रपटासाठी एकत्र आले आहेत. 
 
अवधूत गुप्तेने तरण आदर्श यांचे ट्विट सोशल मीडियावर शेअर करून लिहिले की, जय कोल्हापूर! मित्रांनो... यंदाच्या वर्षी एका धमाक्यासाठी तयार रहा. यावरुन लक्षात येते हा चित्रपटात कोल्‍हपूरचा रांगडापणा पाहयला मिळणार आहे ऐवढे तर नक्‍की आहे. तसेच अवधूतचे कोल्‍हापूर प्रेम पुन्‍हा पहायला मिळणार आहे. अंगमाली डायरीज चित्रपट क्राईम ड्रामावर आधारीत आहे.