सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 25 नोव्हेंबर 2023 (17:07 IST)

हार्दिक जोशीच्या वहिनीचे निधन, राणादा ने पोस्ट शेअर केली

मराठी अभिनेता हार्दिक जोशीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर एक भावूक पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती देणारी आणि एका व्यक्तीची कृतज्ञता व्यक्त करणारी पोस्ट शेअर केली आहे. हार्दिक जोशीच्या वहिनीचं निधन झालं असून त्याने स्वत: भावूक पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली आहे.
 
हार्दिक जोशीची पोस्ट
“ज्योती वहिनी तू आज आमच्यात नाहीये, पण तुझं अस्तित्व आमच्यात कायम राहील. ‘जाऊ बाई गावात’ हा जो नवीन शो मी करत आहे झी मराठीवर तो फक्त तुझ्यामुळे तो पुर्ण शो मी फक्त तुलाच डेडिकेट करतोय. कारण तू माझा हात हातात घेऊन प्रॉमिस घेतलं होतस की हार्दिक काही झाल तरी हा शो तू करणारच आहेस आणि योगायोग असा आहे की ४ डिसेंबरच्या दिवशी हा शो टीव्हीवर दिसायला सुरुवात होणार आहे. त्याच दिवशी तुझा वाढदिवस आहे. मी नेहमी कामाला जाताना तुला नमस्कार करायचो, तेव्हा कायम डोक्यावर हात फिरवून तू मला आशीर्वाद द्यायची. तुझा आशीर्वाद असाच कायम माझ्या पाठीशी असुदे. आज मी जे काही आहे त्यात तुझा खुप मोठा वाटा आहे. तु सदैव आई, बहिण, मैत्रीण म्हणुन माझ्यासोबत पाठीशी होतीस तशीच कायम रहा ही विनंती करतो. तुझी उणीव कायम भासत राहिल. Miss you @jyoti.naisha माझी लाडकी वहिनी मला कधी विसरु नको, Always love you always khup khup miss you”, असे हार्दिक जोशीने म्हटले आहे.” (Social Media)
 
हार्दिकच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. 
 
'जाऊ बाई गावात' या शोमधून हार्दिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून ‘क्लब ५२’ मध्ये हार्दिक जोशी मुख्य भुमिकेत दिसणार आहे. येत्या १५ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.