बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017 (12:55 IST)

'रंगीला रायबा' चे पोस्टर रिलीज

दिग्दर्शक केदार शिंदे यांचा 'रंगीला रायबा' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रंगीला रायबाचे नेमके कोणते रंग आहेत, ते सिनेमा पाहिल्यानंतरच समजणार आहे. Atitude is everything अशी टॅगलाईन असलेला हा चित्रपट म्हणजे मनोरंजनाचा धमाका असणार आहे. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर 'रंगीला रायबा' चे कलरफुल पोस्टर सोशल मिडियावर प्रसिद्ध करण्यात आले. 

दक्षिणेतील चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चित्रपट वितरक विजय बाबू डी. यांची श्री. विजय साई प्रॉडक्शन ही संस्था आणि या पोस्टरमध्ये दिसणारे फ्रेश चेहरे आल्हाद आणि राधिका हे रंगीला रायबा या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत. रंगीला रायबा १० नोव्हेंबर पासून रिलीज होत आहे.