रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 2 ऑगस्ट 2021 (19:29 IST)

प्रार्थना बेहरे 11 वर्षानंतर मालिकेत परतणार

प्रार्थना चक्क ११ वर्षांनी झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या आगामी मालिकेतून मराठी टेलिव्हिजनवर पदार्पण करणार आहे. अनेक चित्रपट आणि मालिकांतून प्रेक्षकांना आपल्या अभिनयाची भुरळ पाडणारी प्रार्थना आता मराठी टेलिव्हिजनच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे यामुळे प्रेक्षक चाहत्यांची उत्सुकता शिगेला गेली आहे.
 
प्रार्थनाने आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमावरही प्रार्थना बरीच अॅक्टिव्ह असून तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. परंतू, गेली दोन वर्ष प्रार्थना मोठ्या पडद्यापासून दूर आहे. त्यामुळे पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना भेटताना आनंद होत असल्याचं प्रार्थना म्हणते.