नव्या चित्रपटाच्या संकल्पासह प्रसाद खांडेकर सज्ज
स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहेरे, प्राजक्ता माळी यांच्यासह अनेक कलाकारांचा कल्ला
नव्या वर्षासाठी प्रत्येकानेच काही ना काही संकल्प केलेला असतो. अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद खांडेकर यांनी ही मराठीतील अनेक कलाकारांना एकत्र आणत नव्या वर्षात नव्या चित्रपटाचा भन्नाट संकल्प केला आहे. त्यांचा हा संकल्प एका व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय मजेशीररित्या त्यांनी प्रेक्षकांपर्यंत पोहचवला आहे.
अभिनेता स्वप्नील जोशी,अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, प्राजक्ता माळी यांच्यासह प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, वनिता खरात, रोहित माने, ओंकार राऊत, प्रियदर्शनी इंदलकर, निखिल रत्नपारखी, सचिन गोस्वामी, चेतना भट, प्रभाकर मोरे, निखिल बने, श्याम राजपूत, श्लोक खांडेकर, प्रमोद बनसोडे, ऐश्वर्या बडदे हे कलाकार या व्हिडिओत दिसतायेत. एकंदरीतच नव्या वर्षात प्रेक्षकांना मनोरंजनाची धमाल मेजवानी या चित्रपटामुळे मिळणार आहे.
'एकदा येऊन तर बघा' चित्रपटाच्या जोरदार यशानंतर दिग्दर्शक प्रसाद खांडेकर यांच्या या नव्या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटाच्या नावाची घोषणा झाली नसली तरी चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे.
नारकर फिल्म्स अँड एंटरटेनमेंट, आयडियाज एंटरटेनमेंट, स्वर्ण पटकथा यांच्या संयुक्त विद्यमाने येणाऱ्या या चित्रपटाचे निर्माते सुनील नारकर व श्री नारकर आहेत तर परितोष पेंटर, सेजल दिपक पेंटर सहनिर्माते आहेत. चित्रपटाचे लेखन प्रथमेश शिवलकर, प्रसाद खांडेकरयांचे असून दिग्दर्शन प्रसाद खांडेकर यांचे आहे. मंदार चोळकर यांनी गीतलेखन तर रोहन-रोहन यांनी संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे.