गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 3 नोव्हेंबर 2022 (08:48 IST)

राज ठाकरे आणि मी बऱ्याच कार्यक्रमात एकत्र येत असून मागील दहा वर्षांचा बॅगलॉक भरून काढत आहोत

vedat veer daudale saat
सत्तांतरानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिंदे यांच्यात जवळीक निर्माण झाली आहे. मागील काही दिवसांपासून राज ठाकरे आणि शिंदे बऱ्याच कार्यक्रमांत एकत्र दिसत आहेत. आजदेखील (२ नोव्हेंबर) शिंदे आणि राज ठाकरे ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या मराठी चित्रपटाच्या शुभारंभ कार्यक्रमात एकत्र दिसले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी आणि सत्तांतर यावर भाष्य केले आहे. तसेच राज ठाकरे आणि मी बऱ्याच कार्यक्रमात एकत्र येत असून मागील दहा वर्षांचा बॅगलॉक भरून काढत आहोत, असे शिंदे म्हणाले आहेत.
 
“ध्येय्यवेडे इतिहास घडवतात. आम्ही साडे तीन महिन्यांआधी एक मोठी दौड लगावली होती. त्या काळात आम्ही कुठून कुठे गेलो, याची आम्हाला कल्पना नाही. लोकांना मात्र याबाबत सर्व माहिती आहे. जनतेच्या मनात जे होतं तेच आम्ही केलं. आता लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहेत. राज ठाकरे आणि मी अनेक कार्यक्रमांत एकत्र येत आहोत. मागील दहा वर्षांचा बॅकलॉक आम्ही भरून काढत आहोत, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor