गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 27 नोव्हेंबर 2023 (13:55 IST)

Rinku Rajguru : रिंकू राजगुरूचा मराठमोठा लूक व्हायरल

rinku rajguru
Instagram
सैराट या चित्रपटाने प्रसिद्ध झालेली अभिनेत्री रिंकू राजगुरू झिम्मा 2 सिनेमात झळकली. या चित्रपटात तिने साकारलेल्या भूमिकेची चर्चा होत आहे. रिंकू नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. तिने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहे. या फोटोमध्ये तिचा ठसकेदार मराठमोळा लूक दिसत आहे. तिने ऑरेंज कलरची काठपदराची साडी नेसली असून नथ घातली आहे. केसात गजरा लावला आहे. रिंकूच्या या मराठमोळ्या लुक्सला चाहत्यांच्या लाईक्सचा व प्रेमाचा वर्षाव होत आहे. तिने वेगवेगळ्या पोझ मध्ये फोटो शेअर केले आहे. 
नागराज मंजुळे यांनी सैराट चित्रपटातुन रिंकूची ओळख करून दिली. या चित्रपटापासून रिंकूला आर्ची म्हणून नवीन ओळख मिळाली. सैराट चित्रपटाने महाराष्ट्राला वेड लावले होते. या चित्रपटाने सर्व रेकॉर्ड मोडले. रिंकू ने  आपल्या या चित्रपटाने प्रेक्षकांना आपलंसं केलं. तरुणांना आपल्या अभिनयाची भुरळ घातली.आर्ची नावाने तिला प्रेक्षक ओळखू लागले. रिंकूने आपले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून चाहत्यांना ते खूप आवडले आहे.  

Edited by -Priya Dixit