सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 13 फेब्रुवारी 2021 (16:38 IST)

शिव ठाकरेचा दिवसभर फ्रेश राहण्याचा 'बी रिअल' फंडा !

बिगबॉस सीजन २ चे विजेतेपद पटकावून संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका बनलेला शिव ठाकरे सध्या एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे. ‘आपला माणूस’ ह्या हॅशटॅगने विशेष ओळखल्या जाणा-या शिवने स्वतःच्या ‘बी-रियल’ ब्रांडची घोषणा केली आहे. त्याच्या सोशल मिडिया साईटवर त्याने ‘बी-रियल’ चा लोगो शेअर करत, त्याची माहिती दिली. बी रीयल हा एक डीयोड्रंट ब्रांड असून, नेहमीच उत्साही आणि फ्रेश राहणाऱ्या शिव ठाकरेचा डीओड्रंट फंडा त्याच्या चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार आहे.
 
आपल्या या ब्रांडबद्दल शिव बोलतो कि, ‘आपण पाहतो की, ऑफिसला जाणारी मंडळी दिवसभर फ्रेश राहण्यासाठी डीओचा वापर करतात. सामान्य माणसाला आपल्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी दिवसभर फ्रेश राहण्यास हा डीओ मदत करेल. बी रियलची टॅगलाईन सेलिब्रेट हसल याच कारणामुळे ठेवण्यात आली आहे. केवळ ऑफिसला जाणारी व्यक्तीच नव्हे तर इतरांनी देखील दिवसभर फ्रेश राहण्यासाठी बी रियलचा वापर करावा.”