शनिवार, 3 डिसेंबर 2022
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified मंगळवार, 7 डिसेंबर 2021 (18:50 IST)

लता दीदींकडून समीर चौघुले यांना खास भेट

फोटो साभार -सोशल मीडिया 
'महाराष्ट्राची हास्य जत्रा 'फेम समीर चौघुले हे नाव महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले आहे.  त्यांच्या आयुष्यात जे काही घडले आहे त्यावर त्यांचा विश्वास बसत नाहीये. काही दिवसांपूर्वी त्यांना गानकोकिळा लता मंगेशकर यांच्याकडून कौतुकाची थाप आणि भेटवस्तू मिळाली आहे. त्यांनी आपल्या इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत आपल्या भावना मांडल्या आहेत. लतादीदी महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम आवडीने बघतात आणि त्यांनी समीर चौघुलेंच्या अभिनयाचे कौतुक करत त्यांच्या साठी कार्ड आणि भेटवस्तू पाठवली आहे. माझ्या आयुष्यात हा क्षण केवळ हास्यजत्रेमुळे आलेला आहे. मी या साठी स्वतःला नशीबवान मानतो की मी हास्य जत्रा कुटुंबाचा एक भाग आहे. मी माझ्या सहकलाकारांचे आभार मानतो. महाराष्ट्राची हास्य जत्रा मुळे माझ्या आयुष्यात हा आनंदाचा दिवस आला आहे. ही आम्हा महाराष्ट्राची हास्य जत्रा कुटुंबासाठी अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. खुद्द लता दीदींकडून कौतुकाची थाप मिळाल्याने समीर चौघुलेंचा आनंद गगनात मावेनासा झाले आहे. त्यांनी आपल्या इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहे.