रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Updated : शनिवार, 1 फेब्रुवारी 2020 (15:36 IST)

सुबोध भावे साकारणार शरद पवार

अभिनेता सुबोध भावे लोकमान्य टिळक, बालगंधर्व, काशीनाथ घाणेकर या बायोपिकमुळे प्रेक्षकांचा लाडका झाला. सध्या सुबोध लवकरच शरद पवारांच्या भूमिकेत दिसणार आहे. अशी चर्चा सुरू आहे. नुकतेच सुबोधने पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. त्यामुळे या चर्चेला सुरूवात झाली आहे. यावेळी सातत्याने व्यक्त होणार्‍या नेत्यांपेक्षा एक नेता जो योग्य ठिकाणी योग्य वेळ येताच व्यक्त होतो, अशा नेत्याची भूमिका साकारायला मला नक्कीच आवडेल, असं तो म्हणाला.
 
या आधी सुबोधने पवारांची भूमिका साकारण्याची इच्छा व्यक्त केली होती. शरद पवारांच्या मनात काय चालल हे तुम्हाला ते कधीच कळू देत नाहीत. हे फार अवघड आहे. त्यांच्या एवढं राजकारण आजपर्यंत कोणीच बघितलं नाही. असं सुबोध म्हणाला. त्यामुळे आगामी काळात शरद पवारांच्या जीवनावर आधारित बायोपिक आल्यास त्यांच्या भूमिकेत सुबोध भावेला पाहण्यासाठी चाहते नक्कीच उत्सुक असतील.